लोणी काळभोर (पुणे) - उरुळी कांचन, लोणी काळभोर, सोरतापवाडीसह पुर्व हवेलीत मागिल पाच दिवसाच्या काळात अडीचेहुन अधिक कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. तर पाच दिवसाच्या काळात तीन जणांचा मृत्यु झाला आहे. कोरोनाने पुर्व हवेलीत धुमाकुळ घालण्यास सुरुवात केलेली असतांना, दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन अथवा नागरीक मात्र कोणत्याही उपाय योजना करत नसल्याचे धक्कादायक चित्र पुढे येऊ लागले आहे. पुर्व हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, सोरतापवाडीसह अन्य मोठ्या ग्रामपंचायत हद्दीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतांना, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अपवाद वगळता वरील सर्वच ग्रापंचायतीचे प्रशासन, आरोग्य विभाग, महसुल विभाग अथवा पोलिस खाते कांहीही उपाय योजना करीत नसल्याचे चित्र दिसुन येत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुर्व हवेलीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असुन, ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व मित्र मंडळीची तपासणी करणेही सोडुन दिलेले आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले अनेक जण बिनधास्तपणे गावात फिरत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.
पुणे-सोलापुर महमार्गावरील भाजीपाला बाजार हटवण्याची गरज
पुर्व हवेलीमधील कोरोना वाढीचे मुख्य कारण पुणे-सोलापुर महामार्गावरील लोणी काळभोर ते पंधऱा नंबर या दरम्यान रस्त्यावरील बेकायदा भाजीपाला बाजारातील गर्दी हे आहे. पुणे-सोलापुर महामार्गावरील लोणी काळभोर ते पंधऱा नंबर या दरम्यान रस्त्यावर मागिल पाच महिण्यापासुन रोज सायंकाळी सहा ते सकाळी सात या दरम्यान भाजी विक्रेते व शेतकरी गर्दी करत आहेत.
तर या दिवसभऱ फळ विक्रेते, हातगाडीवाले, पथारीवाले यांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी शेतकरी व विक्रेते, हातगाडीवाले यांची एकावेळी पाच ते सहा हजारावर लोकांची गर्दी असते. विना मास्क, सोशल डीस्टनसिंग, सॅनिटाइझेशन यांना नियमांना पायदळी तुडवुन बाजार भरला जात आहे. हा बाजार बंद करण्याच्या मागणीसाठी मांजरी बुद्रुक ग्रामस्थांनी आंदोलनही केलेले आहे. मात्र या बाजारावर कारवाई होत नाही हे वास्तव आहे. लोणी काळभोर ते पंधरा नंबर या दरम्यान रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला व्यवसायिकावर कारवाई केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो.
सॅनिटायझेशन व विलगीकरण बंद
कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यास, मागिल कांही दिवसापर्यंत संबधित रुग्णांच्या घरासह परीसर सॅनिटायझेन करण्यात येत होते. तसेच कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक मित्रमंडळी यांच्या स्वॅब चाचण्याही करण्यात येत होत्या. तसेच कोरोनाबाधित रुग्ण घरी जातांना हातावर शिक्का मारुन, संबधित रुग्णाला कांही दिवस घरातच राहण्याची सुचना आरोग्य विभागाकडुन करण्यात येत होती. मात्र मागिल महिनाभऱात वरील सर्व गोष्टी केवळ कागदोपत्री केल्या जात आहेत. कोरोना बाधीत रुग्ण व त्यांचे नातेवाईक बिनधास्तपणे फिरत आहेत. कदमवाकवस्ती, उरुळी कांचन व लोणी काळभोर या तीन बड्या ग्रामपंचायत हद्दीत तर कोरोनाला रोखण्यासाठीच्या उपाय योजना कागदोपत्रीच राबवल्या जात आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांची गरज
-मांजरी बुद्रूक येथील उपबाजार चोविस तास सुरु ठेवावा व व्यापाऱ्यांना ओळखपत्राची सक्ती करु नये.
-पुणे-सोलापुर रस्त्यावरील बेकायदा भाजीपाला बाजार कायमस्वरुपी बंद करण्याची गरज.
-पुणे-सोलापुर रस्त्यावरील हातगाड्या, फळविक्रेते यांच्यावर पोलिसांनी कारवाईचा ससत बडगा उगारावा.
-लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती परीसरातील भाजीपाला बाजारावर वेळेचे बंधन घालावे. बाजारात मास्क व सोशल डिस्टन्सिंगची सक्ती करावी.
-कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होम कोरोटांईन सक्तीचे करावे.
-खाजगी रुग्णालयात उपचारे घेणारे रुग्ण व खाजगी रुग्णालयात कोरोनाची चाचणी करणाऱ्यांची नावे संबधित रुग्णालयाच्या हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला कळविण्याचे बंधणकारक करण्यात यावे.
-ग्रामपंचायत व महसुल विभागाने कोरोना रोखण्यासाठी प्रत्यक्षात उतरावे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.